न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी येथे दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा..
डोर्लेवाडी (ता. बारामती):- येथील रयत
संस्थेच्या "न्यू इंग्लिश स्कूल 'मधून दहावीची
परीक्षा देऊन सुमारे ४२ वर्षापूर्वी म्हणजेच
१९७९ -८० मध्ये वेगवेगळ्या मागनि विविध ठिकाणी कार्यरत असणारे मित्र मैत्रिणी स्नेहमेळाव्यानिमित्त नुकतेच एकत्र आले. यावेळी एकमेकांची आस्थेताईकपणे चौकशी, एकमेकांची सुख -दुख यावर मनमोकळेपणाने चर्चा होऊन जुन्या आठवणीना उजाळा दिला स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कुल डोर्लेवाडी विदयालयाचे मुख्याध्यापक सुनिल साळवे हे होते तर कार्यक्रमाचे अतिथी म्हणून विदयालयातील
माजी शिक्षक मोमीन सर, बागवान सर, गव्हाणे सर,तावरे सर, गायकवाड सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते,स्नेहमेळव्यास उपस्थित असणारे माजी शिक्षक मा. राऊत सर म्हणाले की, बेचाळीस वर्षांनी सर्व विद्यार्थ्यांनी आमची आठवण ठेवली व आम्हाला बोलावून सत्कार केला. यातच आमचे जीवन कृतार्थ
झाले मा. मोमीन सर व मा. गुरव सर यांनी
मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी शाळा समितीचे सदस्य अँडव्होकेट पी. एस.नाळे, प्रा.ए. के. नाळे, प्रा डी.पी राउत, हरी यादव, म्हेत्रे,भाऊ निलाखे, शंकर जाधव, सिंधू नरकडें, प्रकाश भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँडव्होकेट पी·एस नाळे यांनी केले.
No comments:
Post a Comment