लोणी येथे दोन वर्षांनी भरणार महाशिवरात्री यात्रा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 26, 2022

लोणी येथे दोन वर्षांनी भरणार महाशिवरात्री यात्रा..

लोणी येथे दोन वर्षांनी भरणार महाशिवरात्री यात्रा..

लोणी धामणी -प्रतिनिधी -(कैलास गायकवाड):-ता.२७/२/२०२२ लोणी ता. आंबेगाव येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्त मंगळवार दि. १ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच गुरुवार दि. ३ रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असून विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे.
मंगळवारी सकाळी ९ ते १० देवास हारतुरे व मांडव डहाळे आणि दिंडी सोहळा, रात्री सात वाजता छबिना व पालखी मिरवणूक गुरुवारी सकाळी ९ ते ९.३० घोड्यांच्या शर्यती , ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केल्या आहे विजेत्या प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपये रोख व फळीफोड गाड्यास एलईडी टीव्ही, दुसर्या क्रमांकासाठी ४१ हजार रुपये व फळीफोड गाड्यास कुलर, तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये व फळीफोड गाड्यास कुलर आणि चतुर्थ क्रमांकासाठी १५ हजार रुपये व फळीफोड पंखा बक्षीस देण्यात येणार आहे. फायनल मधील प्रथम क्रमांक - सात हजार रुपये व दुसरा क्रमांक - पाच हजार बक्षीस देण्यात येणार आहे. बैलगाडा शर्यतीचे बक्षीस वितरण इंद्राणी बालन फौंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन,आर. एम.डी. फौंडेशनचे अध्यक्ष जान्हवी धारिवाल- बालन व गृह विभागाचे सहसचिव डॉ. कैलास गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.

No comments:

Post a Comment