लोणी येथे नविन बैलगाडा घाट बांधण्याचा शुभारंभ
लोणी-धामणी .प्रतिनिधी,-(कैलास गायकवाड):- दि :.१५/२/२०२२ लोणी (ता.आंबेगाव) येथील जुना बैलगाडा घाट व्यवस्थित नसल्यामुळे व शासनाच्या नियमानुसार घाट करण्यासाठी बांधकामाचा शुभारंभ झाला.बैलगाडा शर्यतीना परवानगी मिळाल्या पासून प्रत्येक गावांमध्ये उत्साह भरून वाहात आहे.लोणीत जुन्या घाटापाशी जास्त अडचण झाल्यामुळे ग्रामस्थांनी नवीन घाट बांधण्याचा मनोदय जाहीर केला.त्यासाठी वडगावपीर रोडच्या बाजूला घाटासाठी जागा निश्चित केली. ४५० फूट लांबीची धावपट्टी व 30 तीस फूट रुंदीची घाटातून बैल बाहेर पडल्यावर त्यांना इजा होऊ नये म्हणून अडथळा होण्यासाठी तळ्याची बांधणी, इत्यादी कामाचाचा शुभारंभ करण्यात झाला.यावेळी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून घाट तयार करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. कामाचा शुभारंभ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसन गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून झाला.यावेळी शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष रोहिदास वाळुंज पाटील, पोलीस पाटील संदीप आढाव, प्रकाश वाळुंज पाटील, कर्मचारी वसंत पंचारास,तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ, सतीश थोरात, विजय आदक पाटीलमाजी सरपंच रंजना लंके,समाज भूषण कैलासराव गायकवाड,डॉ.भीमराव लंघे, राहुल कारंजखेले, भाऊ कदम, विकास पंचरास, शुभम वाळुंज,स्वप्नील धुमाळ,बाळासाहेब गायकवाड, सुहास शिनलकर,सुधीर लंके इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ हजर होते. यावर्षी मंदिराला रंगरंगोटी नवीन चांगला बैलगाडा घाट बनवायचा आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी व गाडा शोकीन बांधवांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन लोणी ग्रामस्थांनी केले आहे.
No comments:
Post a Comment