रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाच्या आणखी एका मागणी अर्जास आणि त्यासाठी केलेल्या पाठ पुराव्यास यश!!
बारामती:- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेस सर्वाच्च प्राधान्य मिळावे याकरिता मा. रविंद्र पप्पू सोनवणे युवक सरचिटणीस पुणे जिल्हा रिपाइं(आठवले), मा. अभिजित कांबळे बारामती शहर अध्यक्ष रिपाइं (आठवले)यांच्या मार्फत दि.20/07/2019 रोजी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर मजबूत व दर्जेदार संरक्षित जाळी बसवण्यात यावी याबाबतचे लेखी निवेदन बारामती नगरपालिका प्रशासनाकडे देण्यात आले होते.त्यामागणीची दखल घेत आज रोजी सदरील काम झाल्याबद्दल रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी मा.मुख्याधिकारी (बा न प) आणि सबंधित अधिकारी यांचे आभार मानले तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय व हककासाठी रिपाइं (आठवले)पक्षाचे बारामती मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सदैव तयार असल्याचे सांगितले..
No comments:
Post a Comment