*कोव्हिड योद्ध्यांसाठी सहलीचे आयोजन.*
*ओंकार (भैय्या) जाधव मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम.*
बारामती:- कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कोव्हिड योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारामतीतील ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने कोकण दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले.*
*मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली.संपूर्ण देश लोकडाऊन झाला.अनेक लोक बेरोजगार झाले.त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला.यावर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात समूह स्वयंपाकघराची (कम्युनिटी किचन) निर्मिती केली.*
*ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी बारामती शहरातील वसंतनगर येथील कम्युनिटी किचनची जबाबदारी टकारी समाज संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओंकार जाधव यांना दिली.ओंकार जाधव यांनी मिशन हायस्कुल येथे वसंतनगर मधील युवकांच्या मदतीने टाळेबंदी काळात दरोरोज चारशे लोकांना अन्नवाटप करण्याचे काम केले.*
*कम्युनिटी किचन सेंटरला ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील,तहसिलदार विजय पाटील,उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी भेट दिली.अन्न वाटपाचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल ओंकार जाधव व सर्व युवकांचे कौतुक केले.*
*स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वसंतनगर मधील युवकांनी नागरिकांना धान्य,भाजीपाला,दूध,किराणा माल,जीवनावश्यक वस्तू घरपोच केल्या.नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली.प्रतिकारशक्ती वृद्धीसाठी होमोयोपॅथीक आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले.*
*कोरोनाच्या भीतीने लोक घराबाहेर पडण्याचं धाडस करीत नव्हते अश्या काळात वसंतनगर मधील युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्याचे काम केले.ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने कोव्हिड योद्धांसाठी कोकण दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले.सहलीत साठ कोव्हिड योद्धा सहभागी झाले होते. कोकणातील निसर्ग,समुद्रकिनारे व जलदुर्ग पाहण्याचा आनंद कोव्हिड योद्धानी घेतला.
No comments:
Post a Comment