परत एकदा नावाचाच वापर..उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या पीऐ शी ओळख असल्याचे सांगून उकळले गेले 10 लाख रुपये.. पुणे : कोण काय व कसा कुणाच्या नावाचा वापर करून फसवणूक करील हे सांगू शकत नाही पण पोलीस मात्र त्याचा तपास काढतातच. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करुन पुणे शहरातील एका
बांधकाम व्यावसायिकाकडे 20 लाखाची खंडणी
मागितल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय
सहाय्यकांच्या ओळखीच्या नावाने 10 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. प्रविण विठ्ठल जगताप (रा. वाई, सातारा अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.तर त्याच्या अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश विश्वास पटवर्धन (सोसायटी, वारजे) यांनी बंडगार्डन पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात.त्यापैकी 5 कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करुन देतो, माझी अजितदादांचा पीए मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे स्वत:ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी ओळख असल्याचे आरोपी आणि त्याच्या साथिदाराने फिर्यादी यांना सांगितले.
तसेच भूषण गगराणी आणि त्यांचे पीए हेमंत
केसळकर यांच्यासोबत देखील ओळख असल्याचे फिर्यादी पटवर्धन यांना सांगितले.फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना 10 लाख रुपये दिले.मात्र पैसे देऊनही काम करत नसल्याने आपली आर्थिक
आल्यानंतर फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस फसवणूक झाल्याचे लक्षातआल्याने
ठाण्यात फिर्याद दिली.त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी प्रवीण जगताप याला अटक केली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहे.
No comments:
Post a Comment