अबब.. महिला तलाठीच लाच घेऊ लागली,20 हजाराची लाच घेताना महिला तलाठ्यासह खासगी व्यक्तीला अँन्टी करप्शनने पकडले रंगेहाथ..
पुणे :महाराष्ट्रात सद्या लाच लुचपत ची कारवाई चालू असून यामध्ये विशेषतः सरकारी अधिकारी व कर्मचारी सापडू लागले आहे, तर चक्क महिला तलाठीच सापडल्याने खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर असे, म्हाळुंगे येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा (7/12) उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी 30 हजार रुपयाची लाच मागून 20 हजार रुपये लाच घेताना महिला तलाठी वर्षा मधुकर धामणे (वय - 45) आणि
खासगी इसम अकबर यांना पुणे लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई खेड तालुक्यातील आंबेठाण तलाठी कार्यालयात बुधवारी केली.याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.तर लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या महिला तलाठी वर्षा धामणे यांच्याकडे म्हाळुंगेसह आंबेठाणचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार यांनी 2017 मध्ये म्हाळुंगे येथे जमिन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांना नोंदणी करायची होती. सातबार्यावर नोंदणी करण्यासाठी खासगी इसम अकबर याने सुरुवातीला एक लाख रुपये लाच मागितली.यानंतर तलाठी वर्षा धामणे यांनी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीत 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी
पुणे एसीबीकडे तक्रार केली.पथकाने 5,8,10 आणि 11 मार्च रोजी पडताळणी केली. पडताळणीमध्ये तलाठी वर्षा धामणे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यांनुसार आज आंबेठाण तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेताना तलाठी वर्षा धामणे आणि खासगी इसम अकबर यांना रंगेहाथ पकडले. आरोपींवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्योती पाटील आहेत.सद्या अनेक शासकीय कार्यालयात महत्वाचे पदावर जिथे महसूल गोळा होतो अश्या ठिकाणी महिलांची नियुक्ती केली असून वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत आर्थिक माया गोळा करताना दिसत आहे अश्या ठिकाणी जर कारवाई करता आली तर..अश्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment