बारामतीची श्रुती कांबळे झाली 2022 ची विनस मिस इंडिया.
बारामती:- दि.27/03/2022 रोजी गोवा येथे झालेल्या मिस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये बारामती च्या श्रुती कांबळे नी प्रथम क्रमांक पटकावत विनस मिस इंडिया किताब पटकवला आहे.या कॉम्पिटिशन मध्ये संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येकी तीन कॅण्डिडेट निवडण्यात आले होते,त्यापैकी महाराष्ट्रातून तीन पैकी पहिली श्रुती कांबळे सिलेक्ट झाली होती,तसेच काल पार पडलेल्या मिस इंडिया स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावत मिस इंडिया हा किताब पटकावला आहे,सर्व सामान्य कुटुंबातील असलेल्या श्रुती कांबळे नि वयाच्या 18 व्या वर्षी हे यश मिळवल्यामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून,बारामती मधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,तिच्या स्वागताच्या तयारीत तिचे फॅन्स तिची वाट पाहत आहेत.
No comments:
Post a Comment