धक्कादायक..'महिला बलात्कार प्रकरण'.. महिलेच्या 'शीला'ची किंमत पोलीस उपनिरीक्षकने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 8, 2022

धक्कादायक..'महिला बलात्कार प्रकरण'.. महिलेच्या 'शीला'ची किंमत पोलीस उपनिरीक्षकने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप..!

धक्कादायक..'महिला बलात्कार प्रकरण'.. महिलेच्या 'शीला'ची किंमत पोलीस उपनिरीक्षकने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप..!
 मुंबई :- महाराष्ट्रात महिलांचा आदर होत असताना काही भागात पोलीस स्टेशनमध्ये महिलांचा आदर केला जातो पण असं एखादे पोलीस स्टेशनमध्ये विचित्र घटना घडते आणि संपूर्ण पोलीस खात बदनाम होतं अशीच काहीशी घटना नुकताच घडली याबाबत समजलेली माहिती अशी की महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्यात महिलेची समजूत काढून तिला बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३७ लाखांची लाच मागून त्यापैकी ७ लाख रुपये स्वीकारताना लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले.या संपूर्ण प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाने या महिलेच्या शीलाची किंमत लावल्याने महिला वर्गात संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे.भरत लक्ष्मणराव मुंढे असे अटक केलेल्या या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.दरम्यान, या प्रकरणात नाव आल्याने ना. म.
जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक राजेश केवळे हे रजेवर गेले
आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता समोर येऊ लागली आहे.भरत मुंढे याचा या प्रकरणाशी तसा काही संबंध नव्हता. शिवाय या गुन्ह्याचा तपास मुंढे याच्याकडे नव्हता. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता समोर येऊ लागली आहे.तक्रारदाराच्या नातेवाईकांवर बलात्काराचा
गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्ह्यात काही करता येईल का यासाठी तंक्रारदाराकडून भरत मुंढे याच्याशी संपर्क साधण्यात आला होता.
गुन्हा दाखल झालेली पार्टी मोठी असल्याचे
लक्षात आल्यावर ही संधी साधण्याची खेळी मुंढे
याने खेळली. त्याने तक्रारदार याला तुम्हालाही
सहआरोपी करतील, असे सांगत घाबरवून
सोडले.या गुन्ह्यात तक्रारदार हिंची समजूत घालता तुमच्याविरुद्ध तक्रार करु नये, यासाठी तिला ३० लाख रुपये द्यावे लागतील.तसेच माझ्यासाठी ५ लाख व वरिष्ठ पोलीस
निरीक्षकासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील,असे त्याने तक्रारदार यांना सांगितले होते.त्याची लेखी तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक
विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ७ लाख रुपये घेताना भरत मुंढे याला रंगेहाथ पकडण्यात आले त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांचे नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात त्यांचा खरोखरच सहभाग होता का ?. का पैसे उकळण्यासाठी त्याने स्वत:हून त्यांचे नाव घेतले. तो या पिडित महिलेच्या संपर्कात होता का ?. तिला तो पैसे देणार होता की स्वत:च ते हडप करणार होता,हा तपासाचा भाग असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांचे नाव आल्याने ते अडचणीत आले आहेत.त्यामुळे त्यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आपल्या
हाताखालील अधिकार्यांच्या कामावर पर्यवेक्षण
ठेवण्यास अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर
येण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment