धनगर समाजाच्या आरक्षण, व प्रलंबित मागण्यांसाठी यशवंत ब्रिगेड च्या वतीने धनगर समाजा च्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

धनगर समाजाच्या आरक्षण, व प्रलंबित मागण्यांसाठी यशवंत ब्रिगेड च्या वतीने धनगर समाजा च्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट..

धनगर समाजाच्या आरक्षण, व प्रलंबित मागण्यांसाठी यशवंत ब्रिगेड च्या वतीने धनगर समाजा च्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांची घेतली भेट..

मुंबई:- राजभवन येथे यशवंत ब्रिगेड च्या वतीने धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची धनगर समाजाचे अनुसूचित जमाती (ST) अंमलबजावणी साठी व धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात विस्तृत  भेट घेऊन चर्चा केली. सदरचा विषय हा राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अखत्यारीत असल्यामुळे  मा राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती यांच्याशी चर्चा करून चर्चा करून महाराष्ट्राच्या यादीतील क्रमांक ३६ वर धनगर जमातीचा समावेश करावा. व धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी करावी.गेली अनेक वर्षे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा प्रश्न रखडलेला आहे त्यामुळे धनगर समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास  खुंटला आहे त्यामुळे समाजाचे नुकसान झाले आहे,तसेच महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला मिळणाऱ्या योजनांना कात्री लावली आहे, त्यामध्ये पुण्यश्लोक  अहिल्यादेवी शेळी- मेंढी विकास महामंडळाला एक हजार कोटी चा निधी मिळावा, महाराजा यशवंतराव होळकर यांचे वाफगाव येथील स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, फिरस्ती मेंढी पालनामधे नैसर्गिक आपत्ती बचावासाठी आधुनिक दर्जाचे तंबू वितरण योजना व शेळी मेंढी यांच्यावर उपचार व लासिकरणासाठी सुसज्ज मोबाईल हॉस्पिटल व तसेच शेळी मेंढी व मेंढपाळांसाठी एकत्रित विमा योजना उतरवा. मेढपाळ बांधवांना संरक्षण मिळावे, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने उद्योजक विकास महामंडळ स्थापन करावे, व समाजात नव उद्योजकांना दहा लाख रुपये विनातरण कर्ज पुरवठा करावा तसेच महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे  हजारो शेळ्या मेंढ्या दगवल्या असून त्याची तत्काळ नुकसान भरपाई मिळावी व मागील सरकारने जे आदिवासींना ते धनगरांना या धर्तीवर २२ योजना, व एक कोटींची तरतूद केली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने लागू केल्या नाहीत. त्या तत्काळ लागू कराव्यात पदोन्नतिचे रद्द केलेले आरक्षण पूर्ववत करावे.या मागण्यांसाठी आज धनगर समाजाच्या, यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर, धनगर समाज महिला एकता परिषदेच्या अध्यक्षा सौ नीहारिका ताई खोंदले, adv वसंतराव शेळके, संपतराव टकले, वसंतराव घुले, चंद्रकांत वाघमोडे, या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली.

No comments:

Post a Comment