भिगवन पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महाविद्यालयात निर्भया पथकाचे कायदेविषयक मार्गदर्शन.. भिगवण:- ता 16/3/2022 रोजी बारामती निर्भया पथकाने माननीय डी वाय एस पी श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भिगवन पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने कला महाविद्यालय भिगवन येथील कार्यक्रमास उपस्थित राहून श्री दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भिगवण पोलिस स्टेशन यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायदेविषयक तसेच पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची उदाहरणासहित माहिती देऊन आई वडिलांचे व गुरूंचे आपल्या आयुष्यातील स्थान हे वय चुकीच्या दिशेने भरकटण्याचे असून आपण आपले ध्येय निश्चित करून जास्तीत जास्त शिक्षण घेऊन योग्य पदावर पोहोचणे अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढलेले असून आई वडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा व विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका कोणत्याही प्रकारे अन्याय अत्याचारच बळी पडू नका बोला व्यक्त व्हा निर्भया पथकाचे मदत घ्या तसेच डायल 112 याची मुली व महिलांनी मदत घ्यावी असे आवाहन केले सौ अमृता भोईटे महिला पोलीस हवालदार यांनी तेथील ज्युनियर व सीनियर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना निर्भया पथक म्हणजे काय निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये निर्भया पथक कशा पद्धतीने कार्य करते, वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा ओळखीचे किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये त्यांचे अत्याचारास बळी पडू नका याची पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची उदाहरणांसहित माहिती दिली पोक्सो अॅक्ट,तसेच तक्रार कोठे व कशी द्यावी,न घाबरता व्यक्त व्हावे,अन्याय सहन न करता प्रतिकार करावा तसेच मुली व महिलांची सुरक्षितता याबाबत निर्भया पथक सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे परंतु नैराश्यात जाऊन जीवन संपून नका जीवन एवढे स्वस्त नाही की ते आपण कोणासाठी तरी संपवावे आई-वडिलांचा गुरुवार्यांचा यांचा आदर करणे समोर योग्य ते ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे वाईट मार्गाला न जाता चांगली संगत धरणे तसेच मुलांना आपल्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर पोलीस चारित्र्य पडताळणी मध्ये तसे प्रमाणपत्र देऊन भविष्यात आपल्याला कुठेही सरकारी नोकरी मिळत नाही तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही याविषयी काळजी घ्यावी अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले डायल 112,100,स्थानिक पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची जास्तीत जास्त मदत घ्यावी असे आवाहन केले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव वाळुंज प्रमुख पाहुणे श्री दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भिगवन पोलीस स्टेशन सौ.अमृता भोईटे पोलीस हवालदार निर्भया पथक, डॉक्टर सौ खरड,डॉक्टर सुरेंद्र सिरसट,प्राध्यापक निलेश जाधव,प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा लामतुरे,प्राध्यापक मनिषा वाघ, प्राध्यापक किरण गुणवरे,प्राध्यापक भाऊसाहेब सकुंडे असे उपस्थित होते.
Post Top Ad
Wednesday, March 16, 2022
Home
ताज्या घडामोडी
भिगवण
भिगवन पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महाविद्यालयात निर्भया पथकाचे कायदेविषयक मार्गदर्शन..
भिगवन पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महाविद्यालयात निर्भया पथकाचे कायदेविषयक मार्गदर्शन..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment