निर्भया पथकाने चंदुकाका सराफ अँड सन्स बारामती यांचे गांधी चौक बारामती या शाखेस दिली भेट.. बारामती:- बारामती निर्भया पथकाने डी वाय एस पी श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली चंदुकाका सराफ अँड सन्स बारामती यांचे गांधी चौक बारामती या शाखेस भेट देऊन महिला पोलीस हवालदार अमृता भोईटे यांनी तेथील 30 ते 40 महिला व 20 ते 25 पुरुष यांना निर्भया पथक म्हणजे काय निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट महिलांविषयक कायदे समाजामध्ये गुन्हे कसे घडतात विश्वास कोणावर ही ठेवू नये त्याबाबत उदाहरणांसहित दाखले देऊन आपल्या पाल्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे मुलांबरोबर चे नाते मैत्रीपूर्ण ठेवून त्यांच्या मनामध्ये पोचून त्यांना बोलते करून ज्या काही समस्या येतील त्या व्यवस्थित हाताळून सोडविणे त्यांना सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी असून त्याबाबत आपण नेहमी जागरूक असले पाहिजे संस्कृती पुरुषप्रधान आहे परंतु कायदा महिलांच्या बाजूने आहे परंतु महिलांना तक्रार द्यावी कशी द्यावी कायदे विषयी असणारे अज्ञान लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल भावकी काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील यामुळे महिला पुढे येत नाहीत बोलत नाहीत व्यक्त होत नाहीत त्यातून त्या अन्याय अत्याचारास बळी पडतात तरी कृपा करून महिलांनी अन्याय-अत्याचार सहन करू नका पुढे या बोला व्यक्त व्हा वेळप्रसंगी निर्भया पथक स्थानिक पोलिस स्टेशन डायल 112 यांची वेळोवेळी मदत घ्यावी महिला व मुलींची समाजामध्ये होणारी छेडछाड थांबविणे तसेच महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे हे समजून पोलीस प्रशासन निर्भया पथक हे महिला व मुलींच्या सेवेसाठी तत्पर असून ज्यावेळी मदत लागेल त्यावेळी निर्भया पथकाची मदत घ्या असे आवाहन केले सदर कार्यक्रमास चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानाचे मॅनेजर दिपक वाबळे व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
Post Top Ad
Tuesday, March 1, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
निर्भया पथकाने चंदुकाका सराफ अँड सन्स बारामती यांचे गांधी चौक बारामती या शाखेस दिली भेट..
निर्भया पथकाने चंदुकाका सराफ अँड सन्स बारामती यांचे गांधी चौक बारामती या शाखेस दिली भेट..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment