*बारामती नगरपरिषदच्या प्रारूप प्रभाग रचनेवर राष्ट्रीय समाज पक्ष बारामती यांचे वतीने हरकत* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 17, 2022

*बारामती नगरपरिषदच्या प्रारूप प्रभाग रचनेवर राष्ट्रीय समाज पक्ष बारामती यांचे वतीने हरकत*

*बारामती नगरपरिषदच्या प्रारूप प्रभाग रचनेवर  राष्ट्रीय समाज पक्ष बारामती यांचे वतीने हरकत*
बारामती:- नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंच वार्षिक निवडनुकीकरता दि 10/3/2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर राष्ट्रीय समाज पक्ष बारामती यांचे वतीने दि 17/3/2022 रोजी हारकत घेण्यात आली.प्रभाग रचना करीत असताना आयोगाने घालुन दिलेल्या नियमाचे उल्लंघन करून सदरची प्रभाग रचना करण्यात आलेली आहे,प्रभाग रचना करीत असताना नदी ,नाले ,ओढे, कालवे, मोहल्ले, मुख्य रस्ते, रेल्वे लाईन इत्यादी भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता सीमा निश्चीत करण्यात आलेल्या आहेत, आयोगाचे घालुन दिलेल्या नियम पायदळी तुडवल्याचे दिसुन येते, प्रगणकांतील असणारी अनुसूचित  जाती- जमातीची लोकसंख्या चुकीची दाखवून त्याची फोड केलेली आहे, या बाबत पुर्वी राष्ट्रीय समाज पक्षाकडून लेखी तक्रार देखील करण्यात आली होती, केंद्र व राज्य  सरकारच्या दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ त्या प्रभागांना मिळण्याऐवजी त्या योजनांचा निधी शहरातील मुख्य सुशिक्षित लोकवस्ती मध्ये वापर करण्याचा हेतु समोर ठेवून वंचित समाजावर अन्याय करून सदरची प्रभाग रचना केलेली आहे,तसेच अनुसूचित जाती -जमातीची एक जागा काल्पनिक दाखवून शहराच्या मुख्य भागात आणुन वाढवलेली आहे त्यामुळे जिथे अनुसूचित जाती- जमातीचे लोकसंख्या  आहे तेथील लोकांनवर अन्याय झालेला आहे.
अश्या पध्दतीने चुकीचे व नियमाचे उल्लंघन करून सदरची प्रभाग रचना केलेली आहे त्यावर राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर यांनी हारकत घेतली आहे...

No comments:

Post a Comment