इलेक्ट्रिक विद्युत मोटारीचे पार्ट चोरताना चोरास पकडले रंगेहात..
लोणी धामणी (प्रतिनिधी कैलास गायकवाड):- ३/३/२०२२ चांडोली खुर्द तालुका आंबेगाव येथील फिर्यादी सदानंद सोनू घुले वय वर्षे ५३ यांनी अमित हरिभाऊ इंदोरी आरोपी राहणार चांडोली खुर्द तालुका आंबेगाव यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की सदानंद सोनू घुले धंदा मोटर वायडिंग बुधवार दिनांक 2 मार्च 22 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चांडोली गावच्या हद्दीत काल भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे घोड नदीच्या किनारी चोरीची घटना घडली आरोपी अमित रुपये चार हजार किमतीच्या टेक्समो कंपनीच्या 15 एचपी पावर च्या मोटारीचे पंख्यावरील बिडाच्या धातूचे गोल गोल नक्षी असलेले चार शेपटी कव्हर प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे विद्युत मोटारीच्या पंख्याच्या सामान चोरी करून घेऊन जात असताना रंगेहात पकडला आहे. ग्रामस्थांनी त्याला पकडून नंतर पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक हे करत आहेत.
No comments:
Post a Comment