श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड च्या तत्कालीन शाखा प्रमुख सह वसुली अधिकारी व इतर जणांनी केली कर्जदाराची लाखो रुपयांची फसवणूक..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड च्या तत्कालीन शाखा प्रमुख सह वसुली अधिकारी व इतर जणांनी केली कर्जदाराची लाखो रुपयांची फसवणूक..!

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड च्या तत्कालीन शाखा प्रमुख सह वसुली अधिकारी व इतर जणांनी केली कर्जदाराची लाखो रुपयांची फसवणूक..!                                                                                            इंदापूर(प्रतिनिधी):-श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा इंदापुर मध्ये काही जणांनी केलेल्या फसवणूकी बाबत सुनिल तानाजी कांरडे वय 35 वर्षे धंदा नोकरी रा रुई बारामती समक्ष इंदापुर पोलीस येथे हजर राहून माहिती दिली, सुमारे 12 वर्षापासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा इंदापुर मध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी.लि ही कंपनी, कंपनी कायदा, 1956 अनुसार 1979 मध्ये नौंदणी झालेली कंपनी आहे. सदर कंपनीची एक शाखा इंदापूर श्रीराम चौक,अकलुज रोड जवळ आहे. कंपनी ही नवीन व जुन्या कमरशियल वाहनांना तसेच व्यवसाय वाढीसाठी गरजु व्यक्तीना तसेच मागणीनुसार कर्ज पुरवठा करते. इंदापूर शाखेत कर्जदार यांची कर्ज प्रकरणे करणेकामी व त्याचेकडून कर्जवसुली करणेकामी आनंद उदावंत ,अमोल सावंत रिलेशनशिप एक्झेकटीव्ह म्हणून प्रमोद चव्हाण,सुरज गायकवाड ,श्रीशील मद्याल, अक्षय बोराडे वैगैरे काम करीत होते.मी इंदापूर शाखा येथील शाखा प्रमुखाचा चार्ज पुर्वीचे शाखा प्रमुख आंनद आशोक उदावंत याच्या कड्न दि 01/10/2021 रोजी घेतला आहे मी व माझे कंपनी मधील सहकारी यांनी फिल्ड वर जाऊन तालुक्यातील कंपनीचे थकीत वाहन कर्जदार यांना भेट्न थकीत कर्ज भरणेची व कर्ज थकविणेचे बाबतचे कारण विचारू लागलो त्यानंतर आमचे तत्कालीन शाखाप्रमुख आनंद अशोक उदावंत व वसुली अधिकारी अमोल सावंत व आर.ई प्रमोद चव्हाण सुरज गायकवाड ,श्रीशील मद्याळ, अक्षय बोराडे यांनीही कंपनीच्या पैश्याचा अपहार केलेची माहिती मिळाली म्हणून आम्ही शाखा प्रमुख आनंद अशोक उदाबंत, रा- बारामती यांना बोलावून चौकशी केली असता, सदर आनंद अशोक उदावंत यांनी स्वतः चूक झालेचे मान्य व कबूल करून, स्वःताच्या फायद्यारीता वापरलेले पैसे आम्ही परत करू असे लेखी लिहुन दिले आहे व अमोल सावंत वसुली अधिकारी, इंदापूर, रा कळंब, वालचंदनगर व इतर रिलेशनशिप एक्झेकेटीव्ह यांनी कंपनीचे कर्जदार यांचेकडून वेळोवेळी पैसे घेतेले परंतु, ते कंपनीत जमा न करता स्वतःचे फायद्याकरता वापरले आहेत तसेच मी स्वतः कर्जदार यांचेकडे चौकशी केली व कंपनी मार्फत झालेल्या ऑडिट्मध्ये असे निदर्शनास आले कि ब-याच कर्जदारांची वरील सर्व लोकांनी मिळूण फसवणूक केली आहे ती पुढील प्रमाणे 1) जगन्नाथ तात्याबा इके यांची
विठठल आटोळे याची 3,80,000/- रू2) अंकुश रामभाउ जावळे यांची 1,60,000 /-रू3) जांलिदर 3,60,000/- रु4) औदुंबर तुकाराम जगताप यांची 50,000/- रू5) भरत विठठल येडे यांची 65,000 /-रू 6) गणेश महादेव जगताप यांची 30,000/-रू7) रमेश बिबीशन क्षीरसागर यांची   88,000/-रु 8) सुंहास गोपीचंद गंलाडे 12,050 /-रू 9) नाना शिवाजी गिरीगोसावी यांची 38,000/- रू 10) लक्ष्मण नवनाथ लोखड़े यांची 12.050/- 11) प्रदीप शत्रुघ्न क्षीरसागर यांची-1,25,000/-रू12) गणेश विलास शिंदे यांची 20,500 /-रू13) संतोश चद्रकांत कोकाटे यांची 70,00014) रंजित मारुती सपकाळ यांची 50,000/-रू15) राहुल औदुबर काळेल यांची 50,000 /-रू16) समाधन भानुदास चोरगे यांची 10,000 /-रू17) बाबुराव सादु तोबरे यांची 73,000/- रू  18) विष्णु संभाजी चव्हाण यांची 76,000/- रू असे एकूण रक्कम 17,32,550/- रूपये यातील आरोपी नामे आरोपी 1) आनंद अशोक उदावंत रा. खंडोबा नगर बारामती जि. पुणे, 2) अमोल मोहन सावंत रा. कळंब वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे,3) प्रमोद चव्हाण रा. आमराई ,बारामती जि. पुणे 4) सुरज चंद्रकात गायकवाड रा. आकोले बु टेभूर्णी ता. माढा जि सोलापुर 5) श्रीशील चंद्रप्पा मद्याळ रा. इंदापूर, जि. पुणे 6) अक्षय संजय बोराडे रा.शेटफळगढे ता इंदापुर जि. पुणे यातील आरोपी कंपनीचे इंदापूर शाखेत कामकारीत असताना त्यानी कंपनीचे कर्जदार यांचे कडून वाहनकर्ज व इंधन कर्जाचे रक्कम वेळोवेळी ऑक्टोबर 2021 पूर्वी घेऊन ते कर्जदार यांचे खातेवर जमा न करता त्यानी एकूण रक्कम रु.17,32,550 /- संगनमताने कट रचुन कर्जदारने विश्वासाने ताब्यात दिलेल्या पैशाचा अप्रमाणीक पणाने कर्जदाराचे व कंपनीचे आर्थिक नुकसान करुन व स्वतःचा फायदा केला आहे म्हणुन माझी त्याच्या विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे.वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करुन गुन्हयाचा पुढील तपास api महेश माने हे करीत आहेत.तर आरोपी अद्यापही अटक नसल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment