आमराईत मान्यवर कांशीरामजी अभ्यासिकेला तिसरे यश...शुभम शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 8, 2022

आमराईत मान्यवर कांशीरामजी अभ्यासिकेला तिसरे यश...शुभम शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती.!

आमराईत मान्यवर कांशीरामजी अभ्यासिकेला तिसरे यश...शुभम शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती.! 

बारामती: येथील आमराई भागातील बहुजन नायक प्रतिष्ठान संचलित मान्यवर कांशीरामजी अभ्यासिकेला तिसरे यश प्राप्त झाले आहे.या अभ्यासिकेतील विध्यार्थी शुभम मिलिंद शिंदे याने घवघवीत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक बनण्याचा मान पटकवला आहे आहे.त्यामुळे अमराईच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.या आधी देखील याच अभ्यासिकेतील विध्यार्थी तेजस मखरे यांनी आरटीओ अधिकारी,संकेत जगताप यांनी मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदी बाजी मारली होती.तर आता शुभम शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक पडला गवसणी घातली आहे. 
         त्यामुळे या तिघां सोबतच मान्यवर कांशीरामजी अभ्यासिकेतील अनेक विध्यार्थी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होतील असा विश्वास मान्यवर कांशीरामजी अभ्यासिकेचे संचालक काळुराम चौधरी यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment