सात वर्षानंतर लोणी गावात झाल्या बैलगाड्यांच्या शर्यती .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 3, 2022

सात वर्षानंतर लोणी गावात झाल्या बैलगाड्यांच्या शर्यती ..

सात वर्षानंतर लोणी गावात झाल्या बैलगाड्यांच्या शर्यती 

 लोणी धामणी - प्रतिनिधी( कैलास गायकवाड ):-ता.३/३/२०२२ लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. महाशिवरात्री यात्रेनिमित्त बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या,सात वर्षानंतर बैलगाडा शर्यत झाली ग्रामस्थांनी नवीन घाटावर शर्यतीचे  आयोजन केले होते. बैलगाडा शर्यतीच्या वेळी उद्योगपती पुनीत बालन व जान्हवी ताई धारीवाल यांनी भेट दिली. पुनीत बालन यांच्या नावे बैलगाडा सोडण्यात आला. पुनीत बालन यांनी पुढच्यावर्षी लोणीचा बैलगाडा हा जिल्ह्यातील एक नंबरचा घाट केला जाईल असे आश्वासन दिले. यांच्यासमवेत जानवी धारीवाल, गृह खात्याचे सचिव कैलास गायकवाड, माजी विद्यार्थी प्रबोधिनी अध्यक्ष उदय राजे वाळुंज, उद्योजक बाळासाहेब गायकवाड, चेतन लोखंडे, उद्योजक राजू थोरात मान्यवर हजर होते.नायब तहसीलदार गवारी, सर्कल अधिकारी शिंदे , कामगार तलाठी मुंगळे, पशुवैद्यकीय अधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते. पोलिस बीट अंमलदार हागवणे व त्यांचे सहकारी  ढोबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.दोन वर्षा नंतर यात्रा झाली. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी जास्त गर्दी केली होती. ग्रामस्थांनी बैलगाडीतून मांडव डहाळे वाजवत गाजवत आणले होते. भंडाऱ्याची उधळण बैलावर  केली. काही भाविक भक्तांनी फराळाच्या  खिचडीचे वाटप केले. तर काही भाविक भक्तांनी केळीचे वाटप केले. बहुसंख्य ग्रामस्थांनी बैलगाडीच्या गाड्यांच्या शर्यती साठी घाटाच्या कामाला आर्थिक साहाय्य केले. तसेच मंदिराच्या  रंग कामाला ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य केले. हा सकाळपासूनच मंदिरामध्ये दर्शनाला मोठी रांग लागली होती. ग्रामस्थांनी मंदिर परिसरामध्ये  साफसफाई व पाणी पिण्याची व्यवस्था केली होती. बैलगाडा शर्यतीचे व यात्रेचे नियोजन, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील, संतोष शेठ पडवळ, सतीश थोरात, नामदेव वाळुंज,  राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलिस अधिकारी किसनराव गायकवाड, निवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश वाळुंज शालेय समितीचे अध्यक्ष रोहिदास वाळुंज, माजी सरपंच  उद्धवराव लंके, विकास पंचारास शुभम वाळुंज,   स्वप्निल वाळुंज , सुहास सिनलकर, सुधीर लंके, हैबतराव आढाव, उत्तम आदक  तरुण वर्ग ग्रामस्थ यांनी उत्तम नियोजन केले.

No comments:

Post a Comment