'गंभीर गुन्ह्यात गुतवण्याची' धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या महिला पोलीस तडकाफडकी निलंबित... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

'गंभीर गुन्ह्यात गुतवण्याची' धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या महिला पोलीस तडकाफडकी निलंबित...

'गंभीर गुन्ह्यात गुतवण्याची' धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या महिला पोलीस तडकाफडकी निलंबित...                                                                                                     पुणे :- ऐकावे ते नवलच आत्तापर्यंत काही ठिकाणी पोलीस असे वागत होते पण आत्ता महिला पोलीस देखील वागत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की, गंभीर गुन्ह्यात 'गुतवण्याची' धमकी देऊन पैशांची मागणी
करुन मारहाण करणाच्या पुणे सायबर पोलीस
ठाण्यातील एका महिला पोलीस शिपायाला
तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे
 लता दत्तात्रय चव्हाण असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. लता चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बुधवारी (दि.2)रात्री उशीरा काढले. लता चव्हाण या पुणे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या सायबर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. चव्हाण यांनी त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नसताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या कार्यक्षेत्रात वाकड येथील एकास धमकावून क्रिप्टो करन्सीच्या गुन्ह्यात अडकवण्याची
धमकी देऊन मारहाण केल्याचा ठपका
त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, लता चव्हाण यांनी केलेले हे वर्तन बेशिस्तीचे,गुन्हेगारी स्वरुपाचे आणि पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याने त्यांना बुधवार (दि.2) पासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. निलंबन काळात निर्वाह भत्ता मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला निलंबन वेतन घेण्यापूर्वी निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकरची खासगी नोकरी करणार नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे.तसेच मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर मुख्यालय सोडायचे असेल तर अपर पोलीस आयुक्त, प्रशासन व पोलीस यांच्या परवानगीने उपायुक्त मुख्यालय सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन काळात दररोज राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे शहर येथे हजेरी लावण्याचे आदेशात नमूद केले असल्याचे कळते.

No comments:

Post a Comment