भिम जयंतीच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांचा पोलिसांना निवेदन
बारामती दि.९:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारामतीत देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.गेल्या दोन वर्षात कोविड च्या प्रादुर्भावामुळे जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही.त्यामुळे यावर्षी कोविड चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आणि नियमांमध्ये शिथिलता असल्यामुळे यंदाचा जयंतीचा उत्सव नेहमी पेक्षा अधिक धुमधडाक्यात करायचा असा निर्धारच समाजातील युवकांनी केला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने येत्या १४ एप्रिल २०२२ रोजी बुद्ध विहार सिद्धार्थ नगर येथून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेच्या परवानगी साठी बारामती शहर पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित सदस्य आरती शंकर गव्हाळे ,सुनीता देवरे बगाडे,गौतम शिंदे, गजानन गायकवाड ,कैलास शिंदे रमेश मोरे ,सोमनाथ रणदिवे सुशील भोसले ,सचिन जगताप, दत्ता चीतारे ,विकास जगताप,चेतन शिंदे,
No comments:
Post a Comment