मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे आरोग्य शिबिराचे उद्धघाटन संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 21, 2022

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे आरोग्य शिबिराचे उद्धघाटन संपन्न..

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे आरोग्य शिबिराचे उद्धघाटन संपन्न..                                                                                     निरगुडसर : प्रतिनिधी.(प्रतिक अरुण गोरडे).दिः२१/०३/२०२२. मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे ग्रामपंचायत मांदळेवाडी व हेल्पिंग हॅन्ड सेव्हिंग हार्ट मते हॉस्पिटल नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पार पडले.या शिबिराचे उद्दघाटन सरपंच कोंडीभाऊ आदक, सविंदण्याचे माजी सरपंच संतोष मिंडे,घेनंद मामा, आपा किठे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक विजय आदक,विश्वनाथ आदक,संतोष आदक,रामदास पालेकर,माजी उपसरपंच पिरभाऊ आदक,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मांदळे,ज्योती गोरडे,रवि ढगे पाटील, फकिरा मांदळे, भिमराव बोत्रे सावकार आदक, नानाभाऊ आदक,भाऊसाहेब बगाटे उपस्थित होते. यावेळी डॉ.आमिर खान व त्यांच्या सर्व सकार्यानी या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी, रक्तदाब,मधुमेह,एसीजी तपासण्या करून योग्य मार्गदर्शन केले. यावेळी मांदळेवाडी परिसरातील शंभर स्त्री पुरुष नागरीकांची तपासणी करण्यात आली यावेळी पाच जणांना ॲन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. 

No comments:

Post a Comment