*वळती गावात विकास कामांचे उदघाटन*
*पारगाव (वार्ताहर पियुष गायकवाड):- वळती ता.आंबेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जनसुविधा या शीर्षकाखाली वळती गावठाण येथे गटरसह अंतर्गत रस्ता करणे, र.रु.२० लक्ष, या मंजूर कामाचे भूमिपूजन समारंभ आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील, शिरुर लोकसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मा.सचिनभाऊ भोर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती महादूशेठ भोर, सरपंच धोंडिभाऊशेठ भोर, रांजनी सरपंच भगवान वाघ, भागडी सरपंच गोपाळ गवारी, सरपंच आनंद वाव्हळ, मा. सरपंच अनिताताई भोर, ग्रा प सदस्या योगिताताई लोंढे, पुष्पाताई लोखंडे, हर्षदाताई भोर, अमृताताई भोर, प्रविणशेठ अजाब, अर्जुनशेठ भोर, नवनिर्वाचित सोसायटी पदाधिकारी, तसेच ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते.*
No comments:
Post a Comment