!! धामणीकरांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आठवड्यात मार्गी लागणार - विवेक वळसे पाटील.!!
निरगुडसर : प्रतिनिधी.(प्रतिक अरुण गोरडे):-दि :१५ /०३/२०२२. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना २०१४-१५ आर्थिक वर्षात मंजूर असलेली मौजे ( ता.आंबेगाव ) पाणी पुरवठा योजना ही येत्या आठवड्यात पुर्ण होऊन दरवर्षी ऐन उन्हाळ्यात भासणाऱ्या धामणीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच टॅकरने देखील पाणी पुरवठा करावा लागणार नाही.
*मंचर (ता.आंबेगाव)येथे संपन्न झालेल्या बैठकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखेले, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, निरगुडसरचे माजी.उपसरपंच रामदास वळसे पाटील, धामणीचे सरपंच सागर जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे श्री टोपे, शाखा अभियंता श्री गांधी, श्री पाटील, सतीश जाधव पाटील, आनंदा पाटील जाधव, ठेकेदार योगेश आदक आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment