आंबेगावच्या पूर्व भागातील जनतेची पी एम पी एम एल बस सेवेची मागणी..
लोणी धामणी= प्रतिनिधी -(कैलास गायकवाड) ता.१०/३/२०२२ आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील जनतेची पुणे ते लोणी बस सेवेची मागणी,पुणे ते आळंदी मार्गे पाबळ, शिक्रापूर ते पाबळ व पुणे ते शिक्रापुर पाबळ अशी सध्या बस सेवा चालू असून, लोणी ते पाबळ आठ किलोमीटर चे अंतर आहे. बेल्हा जेजुरी राज्य महामार्ग ११७चे काम झाले असून, पाबळ ते लोणी हेआठ किलोमीटर अंतर फक्त दहा मिनिटांमध्ये पूर्ण होते. पूर्व भागातील लोणी, धामणी, रानमाळा,खडकवाडी, वडगाव पीर,मांदळेवाडी, पहाडडारा, शिरदाळे, लाखनगाव पोंदेवाडी सविंदणे वाळुंज नगर ,पारगाव, शिंगवे, पोंदेवाडी इत्यादी गावांचा रोज पुण्याला संपर्क असतो. पाबळ ते लोणी महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठलीही सोय नाही. व्यापारी, कामगार, सरकारी कर्मचारी व जनता,आजारी रुग्ण त्यांच्या सोयीसाठी बस ची अत्यंत गरज आहे.पी, एम,पी, एल वाहतूक मंडळाने बस लोणी पर्यंत आणावी अशी मागणी वाजेवाडी चे सामाजिक कार्यकर्ते अमित सोनवणे, भाजपाचे कार्यकर्ते ताराचंद कराळे लोणी चे सरपंच उर्मिला धुमाळ, खडकवाडी चे सरपंच कमल सुक्रे, धामणी चे सरपंच सागर जाधव, वाळुंज नगर चे सरपंच विजय शिनलकर, खादी ग्रामोद्योग चे सदस्य अमित वाळुंज पाटील,शिरदाळे चे सरपंच मयूर सरडे, यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. तर वडगाव पीर,पारगाव,लाखनगाव, पोंदेवाडी ,सविंदणे, वाळुंज नगर, रानमळा या गावातील ग्रामस्थांनीही बस सेवेची मागणी केली आहे.
या परिसरातील आठ ते दहा गावांनी बस मागणीच्या ठरावाचे पत्र, पुण्याच्या वाहतूक पी एम पी एम एल मंडळाकडे दिले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गिरीश बापट आमदार महेश लांडगे इत्यादी नेत्यांकडे मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment