सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 21, 2022

सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार...

सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार...                                                                                                   निरगुडसर : प्रतिनिधी.(प्रतिक अरुण गोरडे):-  दिः२१/०३/२०२२.  पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार प्रथम लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता शिरीष कुमार रोडे पाटील लाखणगाव ( ता.आंबेगाव ) यांना  २०२१ चा पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे,पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक  वळसे-पाटील व लाखणगावचे माजी सरपंच प्रमोद भागवत ग्रामपंचायत सदस्य साधना आरगडे , सामाजिक कार्यकर्ते केर भाऊ दौंड, तुकाराम पोंदे , संदीप धरम ,दिपक रोडे पाटील , माऊली रोडे पाटील ,काळुराम रोडे पाटील , जाकर भाईमुजावर आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी केलेल्या कामाचं चीज झालं अशी भावना लाखणगाव नगरीच्या आदर्श सरपंच प्राजक्ता  रोडे पाटील यांनी व्यक्त केली. याही अगोदर लाखनगाव ग्रामपंचायतला पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय आर. आर.पाटील सुंदर गाव योजनेचा दहा लाख रुपयाचा पुरस्कार मिळवल्याचे रारपंच प्राजक्ता रोडे पाटील यांनी अभिमानाने सांगितले .यावेळी ग्रामसेवक प्रविण खराडे यांनाही आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

No comments:

Post a Comment