महाविकास आघाडी सरकारमधील धनगर समाजातील मंत्री बिनकामाचे:- डॉ अर्चना पाटील
बारामती:- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाला काहीही मिळाले नाही महाविकास आघाडी
सरकार मधील मंत्री स्व:ताला धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणवणारे आणि धनगर समजामुळे राज्यमंत्री झालेले भरणेंनी धनगर समाजासाठी काहीच केले नाही भरणे बिनकामाचे आहेत, त्यांना समाजातील प्रश्नाचे काहीही पडलेले नाही त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे असे धनगर समाजाच्या नेत्या डॉ अर्चना पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर अर्थसंकल्पावरून टीका केली.
गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाला अनेक वर्षांपासून मिळणाऱ्या सवलती बंद झाल्या, अनेक वर्षे धनगर समाजाचा वापर फक्त मते मिळवण्यासाठी झाला आहे यामध्ये ओबीसी, बहुजन समाज, अठरापगड जातीची निराशा यामुळे झाली आहे, हे सरकार विशिष्ट समाजासाठी काम करतय का? असा प्रश्न बहुजन समाजाला पडला आहे, त्यामुळे वंचित घटकांना न्याय मिळत नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांनी अशा प्रकारे जातीवादी भूमिका घेणाऱ्यांना मतदारांनी यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे धनगर समाज हा संघर्ष करणारा समाज आहे, या समाजाने यापूर्वी अनेक दिग्गजांना मातीत लोळवले आहे त्यामुळे समाजातील उच्च शिक्षित लोकांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, आणि समाजाच्या नावावर मते घेऊन समाजाबद्दल न बोलणार्यांना धडा शिकवण्याची गरज आहे, असे यावेळी डॉ पाटील यांनी आपले परखड मत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment