रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा !
पुणे दि. ८ मार्च: - जागतिक महिला दिनानिमित्त रुग्ण हक्क परिषद केंद्रीय कार्यालयात विविध क्षेत्रात अग्रेसर कार्य करणाऱ्या आठ महिलांचा सत्कार समारंभ आज साजरा करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कारमूर्ती मान्यवर महिलांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
रुग्ण हक्क परिषद केंद्रीय कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग, साहित्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या सुप्रसिद्ध महिलांचा विशेष सन्मान आज करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या पद्मा सुहास कांबळे, संस्कृती महिला बहूउद्देश्यिय संस्थेच्या अध्यक्ष शीतल कुंभार, स्वामी समर्थ मेसच्या माध्यमातून करोना काळात पोलीस व रस्तावर असणाऱ्यांना जेवणाची सेवा पुरवणाऱ्या आशाताई घुगे, युवा उद्योजक सोनाली कोदे आणि भावना खेतानी, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या भारती दळवी तसेच पिंपरी चिंचवड येथील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या गंगा धेंडे यांचा विशेष सत्कार आज रुग्ण हक्क परिषद अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अपर्णाताई साठ्ये, विद्या चव्हाण, संध्या निकाळजे यांनी स्वागत केले.
No comments:
Post a Comment