आठ महिने वयाचा बिबट्याचा बछडा पडला विहिरीत..
लोणी धामणी- (प्रतिनिधी - कैलास गायकवाड ):-ता.६/३/२०२२ लोणी,तालुका आंबेगाव,जिल्हा पुणे. येथील शेतकरी बंडोपंत नामदेव सिनलकर रा.गायकवाड वस्ती यांच्या घरासमोरील विहिरीमध्ये, अंदाजे आठ महिन्याचा बिबट्या जातीच्या वाघाचा बछडा पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला. बंडोपंत नामदेव सिनलकर यांनी वन खात्याला कळविले ,वनपाल व्ही. आर. वेलकर, वनरक्षक एस एन अनसूने, डी, आर वाघ, .बाळासाहेब आदक, बाळासाहेब लंके व इतर सहकारी. घटनास्थळी त्वरित हजर झाले. त्यांनी पिंजरा आणून, विहिरीमध्ये सोडला, आठ महिने वयाच्या बिबट्याच्या बछड्याला
व्यवस्थित पिंजऱ्यात सुरक्षित
जेरबंद करून माणिकडोह धरण निवारा केंद्र घेऊन सोडले. ग्रामस्थांनी या वेळेस वन कर्मचाऱ्याना मदत केली.लोणी परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत असून, परिसरामध्ये बिबट्याची मादी असावी, अशी शंका असून, परिसरामध्ये पिंजरा लावावेत अशी मागणी, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी किसन गायकवाड शरद सहकारी बँकेचे संचालक अशोका आदक पाटील, समीर सिनलकर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बबाळशीराम वाळुंज ,माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांनी केली आहे.वनपाल वेलकर यांनी बिबट्याची मादी आसपास वावरत असावी ग्रामस्थांनी व पत्रात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment