*बारामतीतील महिलांचा शिर्डी येथे सन्मान* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 7, 2022

*बारामतीतील महिलांचा शिर्डी येथे सन्मान*

*बारामतीतील महिलांचा शिर्डी येथे सन्मान*

बारामती:-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  बारामती शहरातील वसंतनगर व गौतमनगर येथील महिलांसाठी ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने शिर्डी व शनी शिंगणापूर येथे देबदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आलेहोते.यावेळी शिर्डी येथे सहलीत सहभागी महिलांचा गुलाबाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला.*

*रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातून उसंत मिळावी व धार्मिक स्थळांना भेट देण्याचा आनंद मिळावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीमध्ये १५० महिला सहभागी झाल्या होत्या.*

*सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे,स्वर्गीय रोहिणी जाधव सामाजिक प्रतिष्ठान दौंड अध्यक्ष रवींद्र जाधव यांचे सहकार्य लाभले. ओंकार जाधव मित्र परिवाराच्या स्वंयम सेवकासह सयाजी गायकवाड,बाबा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.*

No comments:

Post a Comment