जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने निर्भया पथकाचा विविध ठिकाणी सन्मान.. बारामती:- जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने काल चंदुकाका सराफ अँड सन्स बारामती यांनी निर्भया पथकाला रोपटे देऊन सन्मानित केले त्यावेळी चंदूकाका सराफ या दुकानाच्या नेहा नेहा किशोर कुमार शहा त्यांचे मॅनेजर दिपक वाबळे अमृता भोईटे पोलीस हवालदार व सर्व निर्भया पथक टीम उपस्थित होते.
***वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत वडगाव ग्रामपंचायत यांचे विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून तेथील खाऊ गल्ली मध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व महिला तसेच फॅशन शो एकांकिका अशा विविध स्पर्धांमधील विजेत्या महिलांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन महिलांचा सत्कार करताना महिला पोलीस हवालदार अमृता प्रवीण भोईटे निर्भया पथक बारामती
**जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया व हायटेक टेक्सटाइल पार्क यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थित कामगार महिलांना निर्भया पथकाचे मार्गदर्शन केले त्यावेळी हायटेक टेक्सटाईल पार्क चे संकेश्वर सर,कैलाशचन्द्र रायगर, डॉक्टर मनीषा मेटे, एपीआय अश्विनी शेंडगे, डॉक्टर अंजली खाडे, वनिता बनकर असे उपस्थित होते
No comments:
Post a Comment