!! धामणीत गुटख्याची केली होळी.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 9, 2022

!! धामणीत गुटख्याची केली होळी.!!

!! धामणीत गुटख्याची केली होळी.!!                  लोणी-धामणी : (प्रतिनिधी.कैलास गायकवाड.):- दिः०९/०३/२०२२. आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील प्रमुख असणाऱ्या धामणी गावामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा आयोजित केली होती. त्यामध्ये गावातील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.त्या सभेमध्ये महिलांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यामध्ये प्रामुख्याने गुटखा बंदी, प्लास्टिक बंदी,पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी यासारखे भेडसावणारे प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व महिलांनी बुधवारी (दिः०९) रोजी गावामध्ये गुटखाबंदी, प्लास्टिक बंदी,दारूबंदी,पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढली,जिल्हा परिषद शाळेसमोरील चौकात गुटख्याच्या पुडयांची होळी करण्यात आली.महिलांनी व शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थिनींनी हातामध्ये फलक घेऊन प्रभात फेरी काढली व घोषणा देऊन जनजागृती केली.त्यानंतर ग्रामपंचायत चौकामध्ये सभा घेतली.त्यामध्ये अनेक महिलांनी मनोगते व्यक्त केली.गावच्या विकासाच्या दृष्टीने आपली मते मांडली.त्याचप्रमाणे गुटख्याचे दुष्परिणाम लोकांना समजून सांगितले व सर्वानुमते गुटखा खाणार्यांना १०० रुपयाचा दंड करण्याचे ठरले.त्याचप्रमाणे गुटखा विकणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी बोलताना सांगितले की,महिला जर संघटीत झाल्या तर गावचा कायापालट होऊ शकतो. भविष्यात आदर्श गाव करण्यासाठी महिलांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.लवकरच गावातील महिलांना बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या उद्योगाला भेट देण्यासाठी नेले जाणार आहे. जेणेकरून त्या प्रकारचा उद्योग-व्यवसाय आपल्या गावात त्या उभा करू शकतील व स्वतःच्या पायावर उभा राहून कुटुंब समाज घडवतील. त्याप्रसंगी सरपंच सागर जाधव,माजी सरपंच अंकुश भूमकर,संदीप बोराडे,अनिता बोऱ्हाडे, रेश्मा बोऱ्हाडे,शिल्पा ससाणे,शिवाजी विद्यालयाच्या शिक्षिका मनवळ मॅडम,यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी उपसरपंच मिलींद शेळके,आनंदा जाधव,युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय राजे विधाटे,तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष दगडुभाऊ करंजखेले,व्हाईस चेअरमन शालीनी यादव,संचालक शांताबाई बोऱ्हाडे,मोनिका गायकवाड,स्वाती कोकणे, सिमा बोऱ्हाडे,जुलेखा इनामदार,शैला जाधव,राणी बोऱ्हाडे,आणि बहुसंख्येने महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या. आभार अरुणा पंचारास यांनी मानले. 

No comments:

Post a Comment