पुणे ग्रामीण विभागात महिला दिन साजरा..
पुणे:- ग्रामीण विभागात दिनांक ०८.०३.२०२२ रोजी जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक ०७.०३.२०२२ रोजी शिवाजीनगर, पुणे येथे महिलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याविषयी सत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. या सत्रासाठी प्रमुख पाहणे म्हणून डॉ. श्री किरण चव्हाण मानसोपचारतज्ञ आणि डॉ. श्री पंकज पवार स्त्रीरोगतज्ञ हे उपस्थित होते. यांनी महिलांच्या आरोग्यासंदर्भात विविध प्रकारची माहिती
सागितली. तसेच महिलांच्या विविध आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
दिनांक ०८.०३.२०२२ रोजी विभागीय कार्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विभागीय कार्यालय व शिवाजीनगर प्रधान डाकघर येथील सर्व कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमासाठी श्रीमती रेखा भळगट, श्रीमती वैजयंती मोर्दे आणि श्रीमती अनघा पटवर्धन या परीक्षक म्हणून लाभल्या होत्या. तसेच सर्व महिला कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास सहाय्यक अधीक्षक श्री भूषण देशमुख , डाक निरीक्षक श्रीमती मानसी शर्मा , पोस्टमास्तर श्री सदाफळे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.याबरोबरच श्रीमती रंजना पानसरे शाखा डाकपाल रांजणी शाखा डाकघर / नारायणगाव उपडाकघर आणि श्रीमती
अश्विनी शिंदे शाखा डाकघर वेनवडी शाखा डाकघर / भोर उप डाक घर यांना महिला दिनाच्या निमित्ताने पंचतारांकित ग्राम योजना राबवील्याबाबत सन्मानीत करण्यात आले. पंचतारांकित ग्राम योजनेमध्ये गावातील १००
घरांमध्ये पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना राबविल्या जातात. सदर योजना राबविण्यासाठी दोन्ही महिला शाखा डाकपालांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे.तसेच निर्मला आनंथा कुचिक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जुन्नर यांनी पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागामध्ये पोहोचवली आणि लोकांना खाती उघडण्याबाबत प्रोत्साहित केले. त्यांच्या या कामगिरी बदल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री बी. पी. एरंडे, अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग , पुणे यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment