उसाच्या शेतामध्ये घेतले गांजाचे आंतरपीक शेतकऱ्यावर गुन्हा दाखल..
लोणी धामणी -(प्रतिनिधी कैलास गायकवाड):- ता.३/३/२०२२ टाकेवाडी तालुका आंबेगाव जि. पुणे येथील शेतकरी संतोष आनंदराव चिखले यांच्या गट नंबर ३२ मधील ६०गुंठे ऊस पिकाच्या सरीमध्ये मध्यभागी चार ते पाच फूट उंचीची गांजाची झाडे लागवड केलेले आढळली.१४.५००किलो वजनाची गांजाची ओली झाडे आढळली.चोरटी विक्री करण्यासाठी झाडे लागवड केली होती. त्यांनी गांजा लागवडीबाबत योग्य शासकीय अधिकार्यास कळविणे गरजेचे असताना,त्यांनी कळवले नाही. कर्तव्यात कसूर केली म्हणून संतोष आनंदराव चिखले यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एन डी पी ए )सन १९८५चे कलम८, (क ),२०(अ )अन्वये सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे. पोलीस निरीक्षक होडगर, पोलीस सब इन्स्पेक्टर बांबळे, पोलीस उपनिरीक्षक शेटे, हवालदार नलावडे, हवालदार साबळे, पोलीस नाईक तांबे, पोलीस शिपाई गवारी, पोलीस शिपाई होले या पथकाने खाजगी वाहनातून जाऊन कारवाई केली. झाडांची किंमत अंदाजे २,९०,०००/- रुपये आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार,पोलीस सब इन्स्पेक्टर बांबळे हे पुढील तपास करत आहे.
No comments:
Post a Comment