लोणी गावचे सुपुत्र किसनराव गायकवाड यांना उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार..
लोणी धामणी -( प्रतिनिधी कैलास गायकवाड ):- २१/३/२०२२ लोणी तालुका आंबेगाव येथील भूमिपुत्र किसनराव अर्जुन गायकवाड यांना पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त.लोणी गावातील शेतकरी कुटुंबातील नवी मुंबई मधील पोलीस सेवेत त्यांनी विविध विभागात काम केलेले आहे पोलिस सेवेत कार्यरत होते. पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्वक उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापूर्वी२०२०साली जाहीर झालेला पुरस्कार आत्ता देण्यात आला. आई-वडिलांच्या चांगल्या संस्काराने एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या या कुटुंबातील दोन मुले शासकीय सेवेत अधिकारी तर एक मुलगा सहकारी बँकेत अधिकारी एक मुलगा उद्योग व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. गावातील विकास कार्यासाठी झटणारे,गायकवाड कुटुंबीय गावातील प्रत्येक विकास कार्यात अग्रेसर असते. गावाला नेहमी प्रेरणास्त्रोत असणाऱ्या अशा कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण आहे. सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे, आनंद लिमये अतिरिक्त मुख्य सचिव, सह सेक्रेटरी डॉक्टर कैलास गायकवाड इतर अधिकारी उच्च अधिकारी हजर होते.
No comments:
Post a Comment