दिवसा घरफोडीचा गुन्हा उघड ९.१७०००/- रुपये किंमतीचा माल हस्तगत..
बारामती:- दिनांक २२/०२/२०२२ रोजी झगडे कॉम्प्लेक्स माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे येथील विनोद दत्तात्रय चांडवले यांचे बंद फ्लॅट चे दरवाजाचे कुलप तोडन १७ तोळे सोने व चांदी एकूण किंमत ८.८३,९००/-
रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी चोरी करून नेले बाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १ = ३/२०२२ भा द वी कलम ४५७,४५४,३८० प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा, पोलीस अधी्क्षक पूणे ग्रामीण यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवान यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.तेव्हापासून पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हातील अज्ञात आरोपींचा बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी स पो नि श्री राहल घुगे, पोलीस हवा. राम कानगुडे, पोलीस नाईक राजेंद्र काळे, पोलीस शिपाई प्रशांत राऊत व दीपक दराडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्री शिवाजी ननावरे, पो हवा अभिजीत एकशिगे, पोलीस नाईक स्वप्निल अहिवळे असे आरोपींचा संयुक्तरीत्या कसोशीने शोध घेत होते.दिनांक ०५/३/२०२२ रोजी यातील आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिवाजी ननावरे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस यांनी आरोपी नामे १) युवराज अर्जुन ढोणे वय २६ वर्षे रा मिरजगाव खेतमाळस वस्ती तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर व २) अविनाश अर्जुन ढोणे वय २६ वर्षे रा सदर यांना संयुक्तरित्या मोठ्या शिताफीने व चलाखीने ताव्यात घेतले, सदर आरोपीना ताब्यात घेवुन गुन्हयातील गेलेला मालाबाबत तपास करत असताना आरोपींनी चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकीं काही सोने व चचांदी इसम नामे निलेश कुंदणमल झाडमुत्था रा डोंगरगण तालुका आष्टी जिल्हा बीड यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यावरून निलेश कुंदणमल झाडमुत्था यास देखिल गुन्ह्याचे कामी ताब्यात घेवुन विचारपुस केल्यानंतर अटक करण्यात आली.यातील अटक आरोपीकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाबाबत विचारपुस करता ते सराईत गुन्हेगार असल्याने उडवाउडविचे उत्तरे देत होते. परंतु पो नि श्री महेश ढवान, स पो निश्री राहुल घुगे व पोलिस अंमलदार राम कानगुडे,राजेंद्र काळे , प्रशांत राऊत. स्था. गु. शाखेचे अंमलदार यांनी विचारपुस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून आरोपींकडे सखोल तपास करता त्यांचेकडून एकून चोरून नेलेल्या मालापैकी एकुण १७ तोळे सोन्याचे दागिने किंमत ८३८०००/ रुपये व चांदीचे लुपिन नाणे व इतर वस्तू असे २००००/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपी क्रं २ याने आरोपी ३ यांचेकडून सोने चांदीचे दागिने विकून आलेल्या पैशातून ६१०००/- रूपये किमतीचा अॅपल १२ मोबाइल व एक नवीन बजाज प्लॅंटिना मोटर सायकल विकत घेतल्याची
कबूली दिल्याने ते देखील गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आले आहे. यातील अटक आरोपींना मा न्यायालयाने दिनांक १०/ ०३/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्री राहूल घुगे करीत आहेत.तसेच यातील आरोपी क्रं. १ युवराज ढोणे हा बारामती तालुका पोलीस स्टेशन १) गु र न ३४/१९ भादवी४५४,३८० २) गु र न. ७३/१९ भा द वी ४५४,३८०,३४ या गुन्ह्यांत फरार असल्याची माहिती अभिलेखावरून समजली आहे.यातील आरोपी क्रं १व २ हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर दाखल गुन्हयांची यादी यासोबत जोडली आहे सदरची कामगीरी मा श्री अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. मिलींद मोहीते अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, मा. गणेश इंगळे. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती. उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अशोक शेळके पोलीस निरीक्षक स्था.गु.शा, श्री. महेश ढवाण पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन,सपोनि श्री राहुल घुगे, पोसई शिवाजी ननावरे, सपोशी काळे, पांढरे, राजापुरे पोहवा कोकरे, कांचन, कानुगडे,घुले, शेळके, मोमीन, पोलीस नाईक काळे, एकशिगे अहिवळे, ठेगळे,चांदणे पोलीस शिपाई प्रशांत राउत, वाघ,धिरज जाधव, दिपक दराडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment