'महिला दिन" बारामती शहर पोलीस ठाणे मध्ये सर्व जबाबदाऱ्या महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीकारला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 8, 2022

'महिला दिन" बारामती शहर पोलीस ठाणे मध्ये सर्व जबाबदाऱ्या महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीकारला..

'महिला दिन" बारामती शहर पोलीस ठाणे मध्ये सर्व जबाबदाऱ्या महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीकारला..     बारामती:- महिला दिनाच्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा. घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत सोपं नसतं पुरुष ही ऑफिस ची जबाबदारी निश्चित महिलांपेक्षा जास्त घेतात परंतु घरची जबाबदारी त्यांच्यावर अजिबात नसते. घरातील मुलांचे संगोपन ज्येष्ठांचा आदर घरातील साफसफाईची कामे स्वयंपाक ही जबाबदारी क्वचितच पुरुष घेत असतात .असा सर्वसाधारण निरीक्षण आहे. म्हणून महिला कर्मचारी यांच्या कामाचा आपण सर्वजण आदर करू या. इतर खात्यातील नोकरी व पोलीस खात्यातील नोकरी यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे महिला कर्मचारी असल्या तरीसुद्धा गंभीर गुन्हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वेळोवेळी उठून त्यांना सर्व कामे बाजूला सोडून कर्तव्यावर हजर राहावे लागते .रात्रपाळीच्या कर्तव्य सुद्धा पुरुषांसोबत करावी म्हणून महिला कर्मचाऱ्यांची नोकरी ही काटेरी मुकुट आहे आणि त्या सक्षम असल्यामुळे तीही जबाबदारी लीलया पेलत आहेत सध्या गुन्ह्यांमध्ये व आंदोलने तसेच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळेच महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी आणखीनच वाढलेली आहे व त्यांना जास्त प्रमाणामध्ये आता फिल्डवर काम करावे लागत ते काम सुद्धा ते लीलया करतात म्हणून सर्व महिला कर्मचारी व अधिकारी यांचा आम्हास सार्थ अभिमान आहे 
आज बारामती शहर पोलीस ठाणे मध्ये सर्व जबाबदाऱ्या महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीकारलेला आहे ठाणे अंमलदार ठाणे अंमलदार मदतनीस बारनिशी वायरलेस सीसीटीएनएस हे सर्व कर्तव्य आज महिला पोलीस कर्मचारी करत अनेक गुन्ह्यांचा तपास सुद्धा महिला कर्मचारी करत आहेत तसेच हरवलेल्या महिला व बालके यांचा शोध घेण्याची कामसुद्धा ते संवेदनशीलपणे करत आहेत आज पोलिस निरीक्षक सुनील महाडिक बारामती शहर पोलीस ठाणे यांनी सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

No comments:

Post a Comment