*आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्याकांड* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 19, 2022

*आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्याकांड*

*आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्याकांड*
पुणे-प्रतिनिधी(बबन क्षीरसागर):- आंतरजातीय प्रेम प्रकरणातून २२ वर्षीय प्रध्युम कांबळे या दलित समाजाच्या तरुणाचे निर्घुण हत्याकांड करण्यात आले असुन यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयावर रिपब्लिकन युवा मोर्चा व आंबेडकरी चळवळीचे शिष्टमंडळ धडकले. व आपल्या मागण्यांचे निवेदन मा. पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा यांचेशी सविस्तर चर्चा करुन सादर केले. या वेळी मा. रमेशदादा बागवे , राहुल डंबाळे , ॲड. भाई विवेक चव्हाण, अविनाशजी बागवे, शैलेंद्र चव्हाण , सुवर्णाताई डंबाळे . संगिताताई तिवारी , स्वातीताई लोखंडे ,आरतीताई जमदाडे, अभिजीत गायकवाड , भिमराव कांबळे, अनिलदादा हतागळे , अशोक लोखंडे , नारायण पोटोळे , सीमाताई मिश्रा , व मयत कांबळे कुटुंबीय व त्यांचे परिसरातील लोक सहभागी झाले होते. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही न झाल्यास याविरुध्द मोठ्या निषेध मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला आहे.असे मातंग एकता आंदोलन च्या वतीने लेखी निवेदनात दिले आहे.

No comments:

Post a Comment