लोणी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 23, 2022

लोणी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू

लोणी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू

लोणी धामणी -(प्रतिनिधी - कैलास गायकवाड):- ता.२२/३/२०२२ तालुका आंबेगाव येथील, भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक लागली असून, शिवशंभो शेतकरी सहकारी पॅनल  च्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला. सर्वसाधारण जागेसाठी सर्वसाधारण जागेसाठी उत्तम श्रीपती आदक, दिलीप विष्णू आदक, वसंत नाथू गायकवाड, किसन शिवराम वाळुंज, बबन विठोबा वाळुंज, शरद झुंबर शेठ वाळुंज, भास्कर अंकुश सिनलकर, अशोक लक्ष्‍मण सिनलकर, महिला गटामध्ये रुक्मिणी वसंत वाळुंज, शांता जालिंदर सिनलकर, इतर मागास वर्ग गटांमध्ये सतीश निवृत्ती थोरात, अनुसूचित जाती गटांमध्ये राजेश तुकाराम सोनवणे विमुक्त जाती जमाती गटांमध्ये कैलास बबनराव गायकवाड अशी एकूण तेरा जण  उभे असून, शिव शंभो शेतकरी सहकार पॅनेलचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाळुंज, माजी सरपंच व शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष उद्धवराव लंके, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील ,आंबेगाव शेतमाल पक्रिया संस्था चे अध्यक्ष भगवान सिनलकर, लोणी च्या सरपंच उर्मिला ताई धुमाळ, रानमळा गावचे सरपंच राजेंद्र सिनलकर, वाळुंज नगर चे सरपंच विजय सिनलकर, महेंद्र शेठ वाळुंज पाटील,प्राचार्य वसंत राव वाळुंज, पांडुरंग दिवटे, मधुकर रोकडे जालिंदर भिकाजी वाळुंज पाटील विठ्ठल गोपाळे, बाळशीराम पाटील  वाळुंज पाटील, बाळासाहेब कोचर, बाळासाहेब संतू गायकवाड, संपत सिनलकर, कमलेश सिनलकर, धोंडीभाऊ वाळुंज पाटील   कोंडीभाऊ वाळुंज हे जुने व जाणते कार्यकर्ते करत आहेत. शिवशंभो शेतकरी सहकार पॅनल गृहराज्य मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक दादा वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत. सदर पॅनेल मधून माजी सरपंच शरद वाळुंज पाटील माजी उपसरपंच अशोक सिनलकर, शिरुर शिक्षक पतसंस्थेच्या माजी अध्यक्षा रुक्मिणी वाळुंज पाटील, लोणी चे माजी उपसरपंच दिलीप पाटील, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक कैलासराव गायकवाड, सर्व अनुभवी सुशिक्षित उमेदवार असून आत्तापर्यंत संस्थेच्या माध्यमातून खरेदी विक्रीसंघाचा खत डेपो, स्वस्त धान्य दुकान, सहकारी बँकेला भाड्याने जागा, व गावच्या विकासासाठी भरीव आर्थिक मदत केली आहे. पुढील काळातही शेतकऱ्यांना सातबारा संस्थेत उपलब्ध व्हावा, व विविध सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उपसरपंच अनिल पंचरास यांनी सांगितले. आत्तापर्यंत संस्थेवर  राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असून, भविष्यातही सर्व सुखसोयी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. असे माजी उपसरपंच राणीताई गायकवाड यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून ग्रामस्थांनी प्रयत्न केले, परंतु पक्षीय गट गटाच्या रस्सीखेच मध्ये निवडणूक लागली.

No comments:

Post a Comment