*कोरोना काळातील महिलांचे कार्य कौतुकास्पद : पौर्णिमा तावरे*
जिजाऊ सेवा संघ्याच्या वतीने गुणवंत महिलांचा सन्मान...
बारामती:-कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कडक लॉकडाऊन असताना महिलांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य न विसरता येण्यासारखे असून तेच कार्य माणुसकीचे दर्शन दर्शवते त्यामुळे महिलांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी केले मंगळवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त बारामती मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यामानाने कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत महिलांचा सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पौर्णिमा तावरे बोलत होत्या या प्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री सातव,नगरसेविका नीलिमा मलगुंडे,डॉ सुहासिनी सातव व वनिता बनकर,कल्पना शिंदे,छाया कदम उपस्थित होत्या या वेळी नगरपरिषद च्या आरोग्य विभाग महिला कर्मचारी ललिता पवार,तालुका पोलीस स्टेशन च्या पोलीस नाईक सीमा चौधरी,वैदकीय महाविद्यालय च्या कोविड विभाग प्रमुख सुप्रिया सावरकर,रुई हॉस्पिटल च्या वैदकीय अधिकारी डॉ ज्योती घोरपडे याना सन्मानित करण्यात आले.या वेळी ओटी भरून,साडी चोळी व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी पवार,चौधरी,सावरकर व घोरपडे यांनी कोरोना काळातील अनुभव कथन करून सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविक स्वाती ढवाण यांनी केले किशोरी सातव यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे,संगीता शिरोळे,अर्चना परकाळे,वंदना जाधव,सुवर्णा केसकर,रसिका गायकवाड, प्रतिभा बर्गे,सुनंदा जगताप ,प्रियंका नलवडे, दिप्ती कदम आदींनी परिश्रम घेतले आभार ज्योती खलाटे यांनी मानले.
No comments:
Post a Comment