*सस्तेवाडी गावात बालसंस्कार वर्गाची सुरूवात*
*जान्हवी सामाजिक संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम*
फलटण, दि.६ - सस्तेवाडी ता.फलटण या ठिकाणी जान्हवी सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा. धनाजी चव्हाण यांनी या धावपळीच्या युगात पालकांना आपल्या मुलांकडे पुरेसे लक्ष देणे शक्य होत नाही लॉकडाऊन मुळे शाळांची होत असलेली अनियमितता त्यामुळे वेळीच मुलांना चांगले संस्कार व्हावेत ही गरज लक्षात घेऊन सस्तेवाडी ,कांबळेश्वर व परिसरातील बालकांसाठी शनिवारी रविवार या दोन दिवसांच्या बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सस्तेवाडी गावच्या सरपंच सौ.ज्ञानेश्वरी राजेंद्र कदम, प्रमुख पाहुणे मा. रामदादा निंबाळकर (उद्योजक), मा.डॉ.सतेश दणाने सर, मा. प्रा.दयानंद बोडके सर हे होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. चंद्रकांत सुर्यवंशी (चेअरमन वि.का.स.सोसायटी) ,मा. सतिष आप्पा सस्ते( अध्यक्ष तंटामुक्ती कमिटी) मा. प्रताप सस्ते (ग्रामपंचायत सदस्य) मा. प्रियंका सस्ते (ग्रामपंचायत सदस्य), मा. आत्माराम सस्ते सर, मा. शिवराज कदम( आर्ट ऑफ लिव्हिंग) मा. गौतम भोसले (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते,हा कार्यक्रम मुक्ताई मंगल कार्यालय सस्तेवाडी या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाला सस्तेवाडी, कांबळेश्वर आणि परिसरातील मुले, पालकवर्ग, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment