लोणी मध्ये नेत्ररोग शिबीर संपन्न, ग्रामस्थांनी केलेले आयोजन..
लोणी धामणी - (प्रतिनिधी - कैलास गायकवाड):- ता.६/३/२०२२ लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. येथे आज नेत्ररोग शिबिराचे आयोजन केले गेले. सुमारे १२५ नागरिकांची नेत्ररोग तपासणी झाली. १९नागरिकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यातील सात जणांना नारायणगाव येथे शस्त्रक्रियेसाठी घेऊन गेले आहेत. वीस रुग्णांना चष्मे वाटप केले. डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव व अखंड हरिनाम सप्ताह मंडळ , माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी, यात्रा कमिटी, व समस्त ग्रामस्थ लोणी. यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग शिबीर आयोजित केले गेले. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसनराव गायकवाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक,अशोकराव आदक पाटील, बाळ शीराम वाळुंज पाटील, विकास सोसायटी संस्थेचे संचालक सतीश थोरात, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ, उपसरपंच अनिल पंचारास, अशोक वाळुंज पाटील, डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे डॉक्टर सुरज संदांशिव, रवींद्र कानडे, संदीप शिरतर आदी मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते. शिबिराचेआयोजन माजी सरपंच व शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष उद्धवराव लंके यांच्या संकल्पनेतून पार पडली.
No comments:
Post a Comment