युवा नेते मा.विक्रम (दादा) लांडगे यांच्या वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा.. बारामती:- कसबा साठेनगर येथे राष्ट्रवादीचे युवा नेते मा.विक्रम (दादा) लांडगे यांच्या वाढदिवस हा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून केला जातो.या वर्षी मा.विक्रम काशीनाथ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी,मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप कार्यक्रम अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, विक्रम लांडगे युवा शक्ती बारामती व बुधरणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक फलकाला पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती बारामती सहकारी बँकेचे संचालक मा.सचिनशेठ सातव यांच्या उपस्थित झाली. यावेळी रा.कॉ. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव,सदस्य समाजकल्याण दक्षता समिती पुणे साधू बल्लाळ,झोपडपट्टी सुरक्षा दल प.म.प्रमुख बापू शेंडगे,सामाजिक कार्यकर्ते अनिल खुडे,संजय भोसले, अमर कांबळे, सतिश मोहिते,बडेभाई मोमीन,हे उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अक्षय लांडगे,सतिश नेटके,
भारत नेटके, महेश नेटके,उत्तम खरात,मच्छिंद्र नेटके,नितीन खरात,अमन मंडले, अतिश लांडगे,दिपक तुपे,संदीप नेटके,सागर पाटोळे,विश्वास लांडगे, संतोष साळवे, ,सुरेश अवघडे इ मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. नेत्रतपासणी शिबिरात 361 रुग्णाणी तपासणी केली, तसेच या वेळी बारामती नगरपरिषद बारामती यांच्या माझी वसुंधरा 2.0 अभियाना अंतर्गत हरित शपथ घेण्यात आली व झाडे लावणे व पाणीबचती विषयी जागृती करण्यात आली.
No comments:
Post a Comment