विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थीचा सन्मान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 10, 2022

विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थीचा सन्मान..

विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थीचा सन्मान..                                                                                  निरगुडसर : ता.आंबेगाव.प्रतिनिधी :( प्रतिक अरुण गोरडे):-श्रीराम विद्यालय,पिंपळगाव- ( ता. आंबेगाव) २०२१-२२ मधील इ.१० वी तील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल श्री गणेश बांगर व सौ सोनाली कामठे यांची पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल तसेच शिष्यवृत्ती, नवोदय या स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.समवेत सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, जि प सदस्या अरुणाताई थोरात, जेष्ठ नेते तुकारामशेठ बांगर, उद्योजक जितेंद्रशेठ बांगर, मथाजीशेठ पोखरकर, व्याख्याते संपतराव गारगोटे, निलेश थोरात, सरपंच दिपक पोखरकर, उपसरपंच वसंतराव राक्षे,ग्रा.प.सदस्य सुनीताताई बांगर,  उद्योजक संदीपशेठ बांगर, अशोक बांगर, शिवाजी पोखरकर, नितीनशेठ बांगर, पप्पू शेठ कामठे, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष अरुण बांगर, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक जगन्नाथ टेके, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक दंडवते सर, आकाश शिंदे, विद्यार्थी-शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment