लोणीत शिवजयंती उत्सहात साजरी
लोणी धामणी -(कैलास गायकवाड):- ता.२२/३/२०२२लोणी येथे शिवजयंती उत्सहात साजरी झाली. गावातून शिव पालखी ची मिरवणूक काढली. मावळयांच्या व शिवाजी महाराज ची वेशभूषा परिधान करून घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. सागर गायकवाड, प्रसाद उदागे,अमोल ढगे,माजी सरपंच रंजना लंके, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पडवळ,माजी सरपंच उद्धव लंके, माजी सरपंच दिलीप वाळुंज,सुधीर सोनार, माजी सरपंच सावळा भाऊ नाईक, नवनाथ गायकवाड, आमित शिरसागर, विशाल वाळुंज, राकेश जंगम व शिवप्रेमी, ग्रामस्थ हजर होते. यावेळी अमोल शिवले यांचे व्याख्यान झाले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज अध्यक्षस्थानी होते.शेवटी स्नेह भोजन होऊन कार्यक्रम संपला.
लोणी बिट अंमलदार तानाजी हगवणे यांनी सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतली. शिवप्रेमींनी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
No comments:
Post a Comment