कल्याण मटका नावाचा चालवत असलेल्या इसमावर गुन्हा दाखल..
लोणी धामणी( प्रतिनिधी -कैलास गायकवाड):- २५/३/२०२२रोजी लोणी गावच्या हद्दीत, लोणी वडगावपीर रोडवर हाडकी भागात सखाराम गणपत पोखरकर वय वर्ष ६७रा. वडगावपीर ता. आंबेगाव हा बेकायदेशीर कल्याण नावाचा मटका चालवीत असताना, जुगार साहित्य व रोख रक्कम ४२८०/-नगद मुद्देमालसहित मिळून आला. सरकार तर्फे पोलीस हवालदार तानाजी सखाराम हगवणे वय ४०वर्ष मंचर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. वरील इसमा विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ )प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी होडगर यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस सब इन्स्पेक्टर चिकणे अधिक तपास करत आहे.
No comments:
Post a Comment