उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात,चक्क मागितली 3 लाखाची लाच..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 27, 2022

उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात,चक्क मागितली 3 लाखाची लाच..!

उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात,चक्क मागितली 3 लाखाची लाच..!
सातारा : सद्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई होताना दिसत नाही पण मात्र पोलिसांनी दारू वर कारवाई केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे, मनुष्यबळ कमी की काय? की आणखी काय यामागे दडलंय हे लवकरच उघड होईलच पण आता लाच घेतल्याची प्रकरणे बाहेर येत आहे, नुकताच सातारा मधील घटना पुढे आली,
बियर शॉपीचा परवान्याचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागणार्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन अधिकाऱ्यांवर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केल्यानंतर
तिघांना अटक केली आहे. निरीक्षक सतीश विठ्ठलराव काळभोर दुय्यम निरीक्षक दत्तात्रय विठोबा माकर (वय-56), जवान नितीन
नामदेव इंदलकर  (वय-36) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत 47 वर्षाच्या व्यक्तीने सातारा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांना नवीन बियर शॉपी सुरु करायची होती. यासाठी ते सातारा
उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे दत्तात्रय मारकर आणि नितीन इंदलकर याने परवान्याचा प्रस्ताव पाठवण्यासाठी तीन लाखाची लाच मागितली.
वरिष्ठ कार्यालयात तर निरीक्षक सतीश काळभोर यांनी तक्रारदाराला लाच रक्कम मागणीस प्रोत्साहन दिले. हा सर्व प्रकार 14 मार्च 2022 रोजी घडला होता.दरम्यान सातारा एसीबीच्या अधिकार्यांनी अनेक वेळा या अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला.मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी ठरलेली लाचेची रक्कम स्वीकारली नाही.परंतु त्यांनी लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे उत्पादन शुल्कच्या दोन अधिकारी आणि एका जवानावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

No comments:

Post a Comment