लीनस क्लब ऑफ बारामती आयोजित ' सात्त्विक आहार निरोगी जीवन' विषयावर आधारित पाककलास्पर्धा संपन्न..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 10, 2022

लीनस क्लब ऑफ बारामती आयोजित ' सात्त्विक आहार निरोगी जीवन' विषयावर आधारित पाककलास्पर्धा संपन्न..!

लीनस क्लब ऑफ बारामती आयोजित ' सात्त्विक आहार निरोगी जीवन' विषयावर आधारित पाककलास्पर्धा संपन्न..!
बारामती:- येथील लीनस क्लब ऑफ बारामती, यांच्या वतीने ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'सात्त्विक आहार निरोगी जीवन' विषयावर आधारित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेमध्ये बारामती आणि परिसरातील महिलांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये महिलांनी कच्या अन्नपदार्थांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यापासून विविध पदार्थ गॅसचा वापर न करता कशा पद्धतीने करता येऊ शकतात, अशा पाककृती सादर केल्या होत्या. खरोखरच या पाककला  नाविन्यपूर्ण  होत्या. यामध्ये अनुक्रमे-माधुरी कुलकर्णी (प्रथम क्रमांक), ऐश्वर्या दोशी(द्वितीय क्रमांक), नम्रता मेहता(तृतीय क्रमांक),डॉ. मीनाक्षी देवकाते(उत्तेजनार्थ), पुनम येनगे (उत्तेजनार्थ) असे क्रमांक देण्यात आले.
    यावेळी महिलांना बारामतीतील सुप्रसिद्ध आहार तज्ञ डॉ. अनोखी शहा यांनी 'सात्त्विक आहार निरोगी जीवन' या विषयावर आधारित मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात महिला आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणे किती महत्त्वाचा आहे, हे त्यांनी महिलांना सांगितले. अन्न कधी, कुठे ,कसे खावे? याबद्दल ही अनोखी शहा यांनी मार्गदर्शन केले. 
  कोरोना काळातील आशा वर्कर  सेविका यांच्या कार्याची दखल घेत लक्ष्मी प्रभा करे,  
प्रितांजली एखंडे,अश्विनी कावरे ,स्वातीबनसोडे,कविता जाधव,शीतल चांदीलकर,संद्या भोईटे,लता पवार, ज्योती मंडले,स्वाती शिर्के यांसह ३१ आशा वर्करला ' कोविद योद्धा' म्हणून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बारामती नगरीच्या माजी नगराध्यक्ष जयश्री भाभी सातव, नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, लीनेस क्लब ऑफ बारामती च्या अध्यक्षा सुमन जाचक, सहसेक्रेटरी धनश्री गांधी, सेक्रेटरी कीर्ती पहाडे उपस्थित होत्या.
कल्याणी गादिया, राधिका घोळवे, सीमा ताटीया संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. तर या कार्यक्रमासाठी कौशल ताटीया यांचे मोलाचे योगदान लाभले. हा कार्यक्रम लीनस क्लब ऑफ बारामती सदस्यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात हॉटेल कृष्ण सागर, भिगवन रोड येथे संपन्न झाला.

No comments:

Post a Comment