खळबळजनक..काॅंग्रेस सेवादल शहर अध्यक्ष व बिल्डर शेखर हरी पाटील यांच्या सह दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल .. ठाणे(शहापूर प्रतिनिधी..)दि.१३ ठाणे काॅंग्रेस सेवादल शहर अध्यक्ष व बिल्डर शेखर हरी पाटील यांच्या सह दोघांवर फसवणूकीचा गुन्हा शहापूर पोलिसांनी दाखल केला आहे.शहापूरातील चौघांना लाखोंचा चुना लावला असून या प्रकरणी कर्जबाजारीपणा ला कंटाळून एका सदनीकाधारकाचा अकाली मुत्यू झाला तर दोघांवर आत्महत्येची पाळी आली होती.
ठाणे येथील काॅंग्रेस नेते व बिल्डर शेखर हरी पाटील यांनी शहापूर कळंभे मधील हरीराज अपार्टमेंट इमारती चे अपुर्णावस्थेत बांधकाम केले आहे.२०१५ साली या इमारतीतील पलैटचे सर्व सुविधा व बैंकेत कर्ज योजनासह बांधकाम पूर्ण होऊन ताबा देण्याची हमी बिल्डर शेखर हरी पाटील व भागीदार निसार नसरुद्दीन मिस्त्री यांनी लतिका सं मुकणे यांना दिली होती.यामुळे तब्बल दहा लाख तीस हजार रुपये रक्कम लतिका सं. मुकणे यांनी बिल्डर शेखर पाटील यांच्या हवाली केली होती.
याचप्रमाणे, शहापूर चेरपोली मधील सुधाकर एन.सोनवणे,सासेनगरातील श्रीमती सुनंदा पंढरीनाथ पडवळ व शशांक रमेश काबाडी यांची देखील लाखों रुपये ची फसवणूक झाली आहे.बिलडर शेखर पाटील विरोधात त्यांनी वारंवार लेखी स्वरूपात तक्रारी केल्या. या कळंभे मधील हरीराज अपार्टमेंट सदनिका धारक यांच्या फसवणूक घटनेत श्रीमती सुनंदा पंढरीनाथ पडवळ यांच्या पतीला कर्जबाजारीपणाचा जबर धक्का बसला. स्वतः ची पदरमोड करून लाखो रुपये खर्चून उभारलेल्या इमारत व अपुर्णावस्थेत बांधकाम मधील पलैट ताबा मिळत नाही.याउलट बैकेचे दरमहा कर्ज फेडण्यापायी मानसिक ताण सहन न झाल्याने श्रीमती सुनंदा यांचे पती पंढरीनाथ पडवळ यांचा अकाली मृत्यू झाला.तर इतर सदनिकाधारकांवर देखील आत्महत्येची पाळी आली असल्याचे नमूद केले आहे. लतिका मुकणे यांनी देखील बिल्डर शेखर हरी पाटीलचा मोगलाई पवित्रा पाहून पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागितली . न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले . शहापूर पोलिसांनी ठाणे शहर सेवादल अध्यक्ष व बिल्डर शेखर पाटील यांच्यासह दोघांवर 420, मोफा अंतर्गत कलमे व इतर अनेक कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लतिका संदिप मुकणे यांनी शहापूर पोलिस ठाण्यात, पोलिस अधीक्षक ठाणे, जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालय दप्तरी सविस्तर तपशील नोंदी तक्रारीत मांडल्या होत्या.मात्र, सदनिका धारक यांच्या फसवणूक घटनेत लतिका सं. मुकणे यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर शहापूर न्यायालयात लतीका मुकणे यांनी ठाणे नौपाडा येथील रहिवासी बिल्डर शेखर हरी पाटील व भागीदार निसार नसरुद्दीन मिस्त्री व खाजगी वास्तू विशारद पि आर चव्हाण यांच्या विरोधात दावा दाखल केला. सदनिका धारक यांच्या सदनिकावर बैंकेतून कर्ज योजना मंजूर करून परस्पर लाखो रुपये सदनिका धारक यांच्या खात्यात जमा न होता बिल्डर शेखर पाटील यांच्या पद्मावती बिल्डर या नावाने परस्पर हडपले. अपूर्ण अवस्थेत असताना कळंभे ग्रामपंचायत ला देखील फसवून इमारत पुर्णत्त्वाचा दाखला देणे व इतर अनेक तपशील तक्रारीत तथ्य आढळले.शहापूर न्यायालयाने लतीका मुकणे यांनी दाखल केलेल्या दाव्यात बिल्डर शेखर हरी पाटील व भागीदार निसार नसरुद्दीन मिस्त्री व खाजगी वास्तू विशारद पि आर चव्हाण यांच्या विरोधात शहापूर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.पोलिसांनी या सर्वांवरच गुन्हा दाखल केला असून सदर फसवणूक घटनेमुळे खळबळ माजली आहे.
No comments:
Post a Comment