लोणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
पारगाव - प्रतिनिधी - पियुष गायकवाड ता.१9/४/२०२२ लोणी तालुका आंबेगाव. येथील हर्ष - संकल्प युवा मंच च्या वतीने हर्षल सुतार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, हर्षल संकल्प युवा मंच, राष्ट्रप्रेमी युवक मंडळ, विश्वकर्मा सेवा मंडळ व ग्रामस्थ यांनी मिळून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तरुणांनी रक्तदानासाठी प्रतिसाद दाखवला, हर्ष संकल्प युवा मंच कायम सामाजिक काम करत असतात. विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो, अनाथ गरीब, विद्यार्थी तो सामाजिक काम करणा-या संस्थांना हा मंच नेहमी मदत करण्यास अग्रेसर असतो .
सदर कार्यक्रमास माजी सरपंच दिलीप वाळुंज पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब वाळुंज पाटील, भैरवनाथ प्रशालेचे साकोरे सर, डुंबरे सर, सिनलकर मॅडम, पोलीस पाटील संदीप आढाव, कैलासराव गायकवाड , जनकल्याण समितीचे संचालक हैबत आढाव,आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक चंद्रकांत गायकवाड, माजी सरपंच जयश्री रोकडे, माऊली क्षीरसागर,संतोष पोखरकर ,बाळासाहेब रोकडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ, सोमवंशी सर, संतोष वायाळ, स्वप्निल वाळुंज, प्रतिक कदम, प्रकाश शिनलकर, इत्यादी ग्रामस्थ व् कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन तात्या लंके यांनी केले.
रक्त संकलनाचे काम पुणा ब्लड सेंटर या संस्थेने केले. डॉक्टर कल्पेश पवार, संदीप शर्मा, समर्थ वाडे, वृषाली पदिर यांनी केले. आभार हर्ष संकल्प युवा मंच चे अध्यक्ष हर्षल सुतार यांनी मानले.
No comments:
Post a Comment