पाणीटंचाईग्रस्त नागरिकांना माजी सरपंच सावळेराम नाईक यांच्याकडून टँकर
लोणी धामणी- (प्रतिनिधी कैलास गायकवाड ):-ता.१०/४/२०२२ लोणी तालुका आंबेगाव. येथील गावातील पूर्व भागातील नागरिकांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांकडे गाई बैल शेळ्यामेंढ्या इ. जनावरे असून, शेतकऱ्यांना दिवसभरात भरपूर पाणी लागत आहे, तीव्र उन्हाळा असल्याकारणाने येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे, शासकीय पाणी टँकर व सुरू झाला नाही. यामुळे शेतकरी व जनावरांचे पाण्यावाचून हाल होत आहे. हृदयद्रावक प्रसंग पाहून गावचे माजी सरपंच सावळीराम नाईक शासकीय मदत मिळेपर्यंत, चार हजार लिटर पाण्याचा टँकर रोज देण्याचे आश्वासन दिले. व त्यांनी टँकर सुरूही केला. शासकीय पाण्याचा टँकर मिळेपर्यंत ही व्यवस्था चालू राहील असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment