जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कराटे प्रशिक्षण शिबीर संपन्न. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 25, 2022

जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कराटे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कराटे प्रशिक्षण शिबीर संपन्न.                                   इंंदापूर:-  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने आज इंदापूर येथे एक दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले तसेच उपस्थित  प्रशिक्षणार्थींना अल्पोपहार देण्यात आला. सदरच्या आयोजन पक्षाचे क्रीडा व कला आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री किरण राऊत सर रासपचे इंदापूर विधानसभा अध्यक्ष बजरंग वाघमोडे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी प्रमुख पाहुणे रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोपने जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे तालुका अध्यक्ष सतीश तरंगे तानाजी शेठ शिंगाडे युवक आघाडीचे कार्याध्यक्ष अतुल शिंगाडे युवा नेते सोन्या भाऊ जानकर विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू जानकर तसेच सरडेवाडी येथील प्रगतशील बागायतदार शंकर चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गोपने बोलताना म्हणाले की कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक बनलेला आहे सध्याच्या डिजिटल जगामध्ये मानवी आरोग्य व मानवी पिढी सुदृढ ठेवायचे असेल तर दररोज किमान एक तास तरी प्रत्येकाने व्यायाम करणे गरजेचे आहे आणि आज इंदापूर तालुक्यामध्ये या दोन प्रशिक्षकांच्या माध्यमातून सुमारे दीड हजार विद्यार्थी कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत त्यामुळे या दोघांचे विशेष अभिनंदन आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षकांची संख्या वाढवून प्रत्येक गावांमध्ये योगासन कराटे प्राणायाम कुस्ती कबड्डी खो-खो या क्रीडा प्रकारांचे वर्ग सुरु करावेत असा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मनीष जाधव यांनी व्यक्त केले

No comments:

Post a Comment